गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (12:16 IST)

तुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान

तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान.. कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
 
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. शोधकत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे तरुण इंटरनेटवर एका आठवडय़ात कमीत कमी 14 तास व्यतीत करतात त्यांचा रक्तदाब अधिक असतो. 
 
या संशोधनादरम्यान अभ्यास करण्यात आलेल्या 134 तरुणांपैकी 26 तरुणांचा रक्तदाब अधिक होता. इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणार्‍यांमध्ये उच्च रक्तदाब अधिक असल्याचं यातून स्पष्ट होतंय. त्याचप्रमाणे, इंटरनेट वापराचा सवयी, चिंता, तणाव, लठ्ठपणा आणि सामाजिक भान न राहणं या गोष्टींशीही संबंध दिसून आला. ‘हेन्री फोर्डस् डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ सायन्सेस’च्या शोधकर्त्या अँन्ड्रिया कासिडी बुशरोव यांच्या म्हणण्यानुसार, इंटरनेटचा वापर हा आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग बनलाय. पण, आपण त्याचा अतिरेक टाळायला हवा.