शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2016 (13:34 IST)

दृष्टिहीन युजर्ससाठी ट्विटरच नवे फीचर

मायक्रो ब्लॉलिंग वेबसाइट ट्विटरनं आपल्या नव्या फीचरची घोषणा केली आहे. ट्विटरचं हे नवं फीचर दृष्टिहीनांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.
 
ट्विटरवर अपलोड करण्यात येणार्‍या फोटोंसोबत इतरही माहिती (Descriptions) टाकता येणार आहे. त्यामुळे विशेष डिव्हाइस वापरणार्‍यांना ब्रेल लिपीमधून फोटोबाबत माहिती समजू शकणार आहे.
 
आयओएस आणि अँड्रॉईडमधील ट्विटर अँप सेटिंगमध्ये जाऊन Compose image descriptions . हा ऑप्शन अँक्टिव्हेट करावा लागणार आहे. ही सेंटिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्विटरवर एखादा फोटो अपलोड कराल तेव्हा descriptionsसाठी विचारणा करण्यात येईल.
 
दृष्टिहीन ट्विटर युजर्सना यामुळे बराच फायदा होणार आहे. फोटो descriptionsमुळे त्यांना फोटोविषयी माहिती समजू शकणार असून त्यामागील उद्देशही समजू शकेल. फोटोखाली देण्यात येणारी माहिती ही तुम्हाला 420 शब्दात देता येणार आहे. या फीचरमुळे सर्च इंजिनमध्ये विशिष्ट ट्विटही शोधता येणार आहे.