शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सॅन फ्रान्सिस्को , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:00 IST)

नेट न्युट्रॅलिटीच्या निर्णयाने झुकेरबर्गला धक्का

ट्रायने नेट न्युट्रॅलिटी धोरणाला दिलेल्या पाठिंब्यानंतर धक्का बसल्याची प्रतिक्रिया फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी नाराजी दर्शविली आहे.
 
इंटरनेट.ओआरजीचे अनेक उपक्रम आहेत आणि प्रत्येकाला इंटरनेट मिळेपर्यंत हे उपक्रम सुरुच राहतील, असे झुकेरबर्ग म्हणाले. दूरसेवा क्षेत्रातील स्पर्धा टिकून राहावी आणि इंटरनेट शुल्कात सूसुत्रता राहावी, यादृष्टीने ट्रायने सोमवारी नेट न्युट्रॅलिटी धोरणाला मंजुरी दिली. त्यानंतर झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे.