गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:57 IST)

नेटवर्क नसतानाही आता करा कॉल

मोबाइलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकवेळा महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत. पण आता यावरही तोडगा निघाला आहे. मोबाइलचं नेटवर्क नसतानाही आता तुम्हाला फोन करता येणं शक्य होणार आहे.
 
लिबोन अँपच्या माध्यमातून तुमची ही समस्या दूर होऊ शकते. या अँपचं नवीन फीचर ‘रिच मी’मुळे तुम्ही नेटवर्कमध्ये नसतानाही कॉल करू शकता, इतकंच नाही तर या अँपमुळे तुम्हाला कॉल रिसिव्ह करणंही शक्य होणार आहे. वायफायच्या मदतीनं याचा वापर करता येणार आहे. तुमचं वायफाय ऑन असल्यास फोनमध्ये नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकता. हे सगळे कॉल तुमच्या मोबाइल नंबरवरुनच जातील.
 
लिबन अँपवरून कॉल करण्यासाठी दुसर्‍याच्या मोबाइलमध्ये लिबन अँप असायची गरज नाही. या अँपच्या माध्यमातून तुम्ही भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या 100 देशांमध्ये कॉल करू शकता.