शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुक पोस्टने कमवू शकता पैसे

सर्वांच्या आवडत्या फेसबुक पोस्टमुळे आपण पैसे कमवू शकता असे म्हटल्यावर तर पोस्ट करणार्‍यांची लॉटरीच लागली समजा.
 
असे ऐकण्यात आले आहे की फेसबुक अश्या टूलवर काम करत आहे ज्या माध्यमाने फेसबुक यूजर्स आपल्या पोस्टने पैसे कमवू शकता. द वर्जच्या एका रिपोर्टनुसार अलीकडे फेसबुकने काही यूजर्सला सर्व्हे सैंपल्स पाठवले ज्यात फेसबुकवर पैसे कमाविण्याचे मार्ग सुचवण्याबाबद प्रश्न होते.
फेसबुकद्वारे पाठवलेल्या या सर्व्हेमध्ये एक व्हर्च्युअल टिप जार पर्याय आहे. यामाध्यमातून फेसबुक यूजर एखाद्या पोस्टाऐवजी टिप म्हणून पैसे देऊ शकतो.
 
सध्यातरी फेसबुकवर असा फीचर नाही ज्याने यूजर्स पैसे कमावतील, पण यावर विचार केला जात आहे.