शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:17 IST)

फेसबुक मेसेंजरचंही ‘वेब व्हर्जन’ लॉन्च

तुम्ही फेसबुक मेसेंजर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे.. आता, हे मोबाइल अँप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला केवळ मोबाइलवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. कारण, फेसबुक मेसेंजरनं आपलं वेब व्हर्जन लॉन्च केलंय. यामुळे, आता तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर किंवा टॅबलेटवरही या सेवेचा लाभ घेऊ शकाल.

यावर, तुम्ही म्हणाल फेसबुक तर पहिल्यापासूनच वेब व्हर्जनमध्ये आपल्या यूजर्सना ही सुविधा देतं, मग याचा काय उपयोग? तर त्यावर मेसेंजरच उत्तर आहे की, मेसेंजर टूलचे हे वेब व्हर्जन आपल्या उपभोगकत्र्यांना कोणत्याही अडचणीशिवाय चॅटिंगची सुविधा उपलब्ध करून देईल. फेसबुकच्या मुख्य पेजवर ही सुविधा तुम्हाला मिळू शकेल. फेसबुकनं नुकतंच आपली मेसेंजर सेवा आपलं मुख्य पेजहून वेगळे वेबसाइट messenger.com च्या रूपात सुरू केलीय. या नव्या वेबसाइटच वापर करण्यासाठीही तुमच्याकडे फेसबुक अकाउंट असणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, फेसबुकवरील इतर सेवा टाळून ज्या उपभोगकत्र्यांना केवळ चॅटिंग करणं आवडतं, अशांसाठी फेसबुकनं messenger.com ही सेवा उपलब्ध करून दिलीय.