शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 2 जून 2014 (11:12 IST)

फेसबुकचा जास्त वापर करणार्‍या महिला ‘एकाकी’

ऑस्ट्रेलियाच्या एका युनिव्हर्सिटीनं फेसबुक वापरणार्‍या महिलांसंबंधी एक रोचक शोध समोर आणलाय. या शोधकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ अँक्टिव्ह राहणार्‍या आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अधिकाधिक माहिती देणार्‍या महिला आपल्या जीवनात खूप एकटय़ा असतात. ‘साऊथ वेल्स’च्या चार्ल्स स्टुअर्ट युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी या अध्ययनासाठी फेसबुकवर 616 महिला युजर्सचे पोस्ट, प्रोफाईल आणि त्यांच्या अपडेट स्टेटसचा अभ्यास केला. वेबसाईट ‘सी-नेट’वर जाहीर केलेल्या या रिपोर्टनुसार या महिला फेसबुकवर आपल्या रिलेशनशीप स्टेटस, आवड-निवड याबाबतीत खूप दक्ष असतात.. पण, त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनात मात्र एकटं जीवन जगत असतात. अहवालानुसार, ज्या महिलांना खासगी जीवनात एकाकी वाटत असतं त्या फेसबुकवर आपली आवड-निवड, संगीत इतकंच नाही तर आपला  मोबाइल नंबर आणि घरांचे पत्तेदेखील शेअर करायला संकोच करत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या वर्षी मिशिगन युनिव्हर्सिटीनंही असाच एक रिपोर्ट जाहीर केला होता. दिवसभरात आपल्या वेळेतील जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर व्यतीत करणारे लोक आपल्या खासगी आयुष्यात दु:खी असतात, असं यामध्ये म्हटलं गेलं होतं.