शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:50 IST)

फेसबुकची सेवा 45 मिनिटे ठप्प

सोशल नेटवर्किगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुकची सेवा मंगळवारी दुपारी 12.45 मिनिटांनी तासाभरानंतर पूर्ववत झाली आहे.
 
फेसबुकचा सर्व्हर सकाळी पावणेबाराच्या सुमारास बंद पडला होता. यामुळे अमेरिका व आशिया खंडामध्ये फेसबुकची सेवा ठप्प झाली होती. फेसबुकची सेवा बंद झाल्याची चर्चा व्हॉट्सअँप व ट्विटरवर नेटिझन्स करत होते. एक तासानंतर ही सेवा पूर्ववत झाली. या काळामध्ये ‘इन्स्टाग्राम’ची सेवा सुद्धा बंद होती. दरम्यान, 9 जून 2014 रोजी फेसबुकला अशा प्रकारे व्यत्यय आला होता.