बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2016 (10:02 IST)

फ्री वायफाय वापरताना या तीन गोष्टी करू नका

आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. 
 
1. पब्लिक वाय-फायवर कधीही सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका. यामुळे तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस येऊ शकतो. यामुळे तुमची माहिती हॅक होऊ शकते. त्यामुळे कोणतेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे टाळाच. 
 
2. पब्लिक वाय-फायवर ऑनलाईन बँकिंगचा वापर करू नका. हे अतिशय असुरक्षित आहे. यामुळे तुमची माहिती हॅक होऊ शकते. 
 
3. तुमच्या डिव्हाईसला सिक्युरिटी असायला हवी. यासाठी तुम्ही अँन्टीव्हायरस इंस्टॉल करू शकता. तसेच ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करू शकता.