शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2015 (11:32 IST)

बंद होणार गुगल प्लस

सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलने आपली सोशल नेटवर्किंग साईट गुगल प्लसला बंद करण्याची तयारी सुरू केली असून फेसबुकला तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने गुगलने गुगल प्लसची चार वर्षापूर्वी सुरुवात केली होती.
 
गुगलशी जोडलेले सगळे उपक्रम गुगल प्लसवरून काढून टाकण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. कंपनीने गुगल प्लसची वाटणी करण्याची मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत गुगलच्या विविध सुविधांना सेवा द्यायला गुगल प्लसची प्रोफाइल असणे जरूरीचे आहे. पण भविष्यात असे राहणार नाही. सगळ्या गुगल सेवेसाठी एकच अकाउंट असले तर त्याचा वापर करणे सुकर जाईल, अशी लोकांची मागणी आहे. हे वक्तव्य गुगलचे उपाध्यक्ष ब्रेडली होरोवित्झ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केले आहे.