शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (11:25 IST)

माक्रोसॉफ्टचा पहिला लॅपटॉप सर्फेस बुक

सॉफ्टवेअर निर्मितीत आघाडीची कंपनी माक्रोसॉफ्टने सर्फेस बुक हा आपला पहिलावहिला लॅपटॉप सादर केला. विंडो 10 या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या लॅपटॉपबरोबरच कंपनीने लुमिया स्मार्टफोन, सर्फेस प्रो टॅब्लेट आणि माक्रोसॉफ्ट बँड या वेअरबल फिटनेस ट्रॅकरची सुधारित आवृत्तीही यावेळी दाखल करण्यात आली. ही सर्व उपकरणे विंडो 10 वर चालणारी आहेत.
 
माक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, सर्फेस बुकची किंमत 1,499 डॉलरपासून सुरुवात होत असून अँपलच मॅकबुक प्रोच्या तुलनेत हा लॅपटॉप दुपटीने वेगवान असल्याचा   कंपनीने दावा केला आहे. हा लॅपटॉप 26 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून बुधवारपासून प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. 13.5 इंचाचा हा लॅपटॉप आहे. याबरोबरच तीन लुमिया फोनची घोषणा केली असून यातील लुमिया 950 आणि 950 एक्सएल या फोनची किंमत अनुक्रमे 549 डॉलर आणि 649 डॉलर, तर लुमिया 550 ची 139 डॉलर एवढी किंमत असून हे फोन डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.
 
लुमिया 950 हा 5.2 इंच स्क्रीनचा फोन असून यात हेक्साकोअर सीपीयूसह क्लालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आहे. 5.7 इंच डिस्प्लेच 950 एक्सएलमध्ये ऑक्टा-कोअर सीपीयूसह स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहेत. तर 4.7 इंचाच्या एसडी डिस्प्ले असलेल्या लुमिया 550 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आहे. या फोनबरोबरच सर्फेस प्रो 4 हा 899 डॉलर किमतीचा टॅब्लेटही दाखल केला. 26 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार्‍या या टॅब्लेटसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली आहे.