मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 (13:35 IST)

यंदा दिवाळीत 25 हजार कोटींची ऑनलाइन खरेदी

दिवाळीच्या तोंडावर बहुतेक सर्वच ऑनलाइन कंपन्यांनी बंपर डिस्काउंट देण्याची तयारी सुरू केली असल्याने यंदा ग्राहक या फेस्टीव्ह सीझनमध्ये अंदाजे 25 हजार कोटींची ऑनलाइन खरेदी करतील असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. गतवर्षी याच काळात 20 हजार कोटींची खरेदी केली गेली होती. यंदा अप्लायन्सेस, कॉस्मेटिक्स, ज्युलरी, परफ्यूम्स, शूज, इलेक्ट्रीक वस्तू अशा अनेक गोष्टींवर डिस्काउंट दिले जात आहेत. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत म्हणाले, यंदाचा फेस्टीव्ह सीझन हा कंपन्यांसाठी सर्वात बिझी सीझन असेल असे संकेत मिळत आहेत. या संदर्भात कंपनीने 2500 वर्किग प्रोफेशनल्सचा सँपल सर्व्हे केला. तेव्हा त्यातील 60 टक्के लोकांनी ते ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात असे सांगितले. यामागे दुकानात लागणार्‍या लांबच लांब रांगा टाळण्याबरोबरच ऑनलाइनचा चांगला पर्याय असल्याचे दिसून आले. शिवाय यात सोपी खरेदी, डिलिव्हरीचे अनेक पर्याय, पेमेंट मोडसाठी अनेक ऑप्शन्स, तसेच विविधता व चांगल्या ऑफर्स आणि बंपर डिस्काउंट यामुळेही ऑनलाइन खरेदीला पसंती दिली जात असल्याचेही दिसून आले.