शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2016 (10:36 IST)

रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग

तुम्हीही जर रात्री झोपण्यापूर्वी लाईट बंद असतांना स्मार्टफोन वापरत असाल तर असं करणं तुम्हाला महाग पडू शकतं. असं केल्यामुळे दोन महिलांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर अनेकांमध्ये डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. 
 
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार 22 वर्षीय तरुणीला अंधारात स्मार्टफोन वापरल्यामुळे तिच्यात आंधळेपणाची काही लक्षणं दिसून आली. पण त्यानंतरही तिने सावधान होण्याऐवजी असं करणं सुरुच ठेवलं. 
 
यामुळे तिला तिचे डोळे गमवावे लागले. ट्रांजिएंट स्मार्टफोन ब्लाइंडनेस हा नवा आजार काही लोकांमध्ये आढळून आला आहे. काही वेळेस डोळ्यासमोर अंधारी येणं हे याचं प्रमुख लक्षण आहे. स्मार्टफोन वापरतांनाही जर अचानक डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर मग टेम्पररी ब्लाइंडनेसचा असू शकतो आणि तरीही जर तुम्ही ही गोष्ट करत राहिला तर तुम्हाला तुमचे डोळे गमवावे लागू शकतात. अंधारात फोन वापरतांना डोळे हे स्क्रीनच्या उजेडाच्या तुलनेत कमी काम करत असतात. पण लगेचच जर तुम्ही दुसर्‍या डोळ्याचा वापर करत असाल तर तुमचे डोळे ते सहन करु शकत नाही. यामुळे कधी-कधी ब्लाइंडनेसचा अनुभव येतो. यापासून सावध होणं खूप आवश्यक आहे.