बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (10:41 IST)

रिलायन्स जियो सिम कार्डसाठी द्या एक युनिट रक्त!

आता स्वतंत्र भारतात रक्ताच्या कमतरतेमुळे होणार्‍या आजारांना रोखण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने तरुणांना केलेले आवाहन असून तरुणांना यावेळी इंग्रजांच्या पारतंर्त्यातून मुक्त न करता एक युनिट रक्तदानाच्या बदल्यात त्यांना रिलायन्स जियो सिम कार्ड मोफत दिले जात आहे. या योजनेला तरुणांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रक्तदान करण्यासाठी दिल्लीजवळ असणार्‍या गाझियाबाद जिल्ह्यात तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहराच्या नवयुग मार्केटमध्ये आयोजित या रक्तदान शिबिरात जियो सिम फ्री मिळविण्यासाठी मोठय़ा संख्येने तरुण रक्तदान करत आहेत. रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, शिबिरामध्ये रक्तदान करणार्‍या व्यक्तीकडे आधार कार्ड, फोटो आणि 4G सपोर्ट स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, या शिबिराच्या माध्यमातून जमा रक्त ब्लड बँकेत पाठविले जाईल. तेथून गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जाईल.