शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|

लव्ह चॅटवर बंदी

WD
पाकिस्तानात मोबाइल कंपन्यांकडून पुरविल्या जाणार्‍या ‘लव्ह चॅट’ या सुविधेवर त्या अनैतिक असल्याच्या कारणावरून बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटीने (पीटीए) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या ‘लव्ह चॅट’च्या विरोधात काही पालकांनी आणि कायदेतज्ज्ञांनी निदर्शने केली होती. रात्रीच्या वेळी या चॅटवर अनेक तास बोलता येते. मात्र, त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवणे कठीण होत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले होते. त्यानंतर ‘पीटीए’ने ही बंदी लागू केली आहे. टीकाकारांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे. सेन्सॉरशीप लागू करण्याचा हा नवा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात ‘पीटीए’ने स्वस्त चॅटिंग आणि रात्रीच्या उशिरापर्यंतच्या बोलण्याचे दर वाढविले. मात्र, मोबाइल कंपन्यांनी वेगळ्या नावाने पुन्हा चॅट सुविधा देण्यास सुरू केले होते. रात्री उशिरा स्वस्त दरात बोलणे किंवा इंटरनेट सर्फिग करणे शक्य होत असल्याने मुलांवर लक्ष ठेवणे कठीण होत असल्याचे पालकांचे म्हणणे ग्राह्य धरून ही बंदी घालण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानात ‘लव्ह चॅट’ ही सुविधा किती तरुण-तरुणी वापरतात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पाकिस्तानमध्ये एका कॉलसाठी दोन रुपये, तर मेसेजसाठी दीड रुपया मोजावा लागतो. मात्र, चॅट सर्व्हिसचे दर एका तासासाठीचे असल्याने त्याला युवावर्गाकडून पसंती मिळत होती.