गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2015 (11:18 IST)

वजन घटवायचेच मग ऑनलाईन गेम खेळा

संगणकांवर काम करण्याचे वाढलेले प्रमाण, दूरदर्शन पाहण्याच्या वेळात झालेली वाढ व एकंदरीतच बैठ्या जीवनशैलीमुळे जगभरातच निर्माण झालेला ओबेसिटीचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे येत असतानाच वजन घटविण्यासाठी ब्रिटिश संशोधकांनी पुन्हा ऑनलाईन गेम तयार केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वजन घटविण्यासाठी व्यायाम नको, डाएट नको आणि मनाचा कोंडमाराही नको. हा गेम खेळून खेळाचा आनंद घेतानाच तुमचे वजनही आपोआप कमी होणार आहे.
 
हा खेळ थोडा वेळ म्हणजे 10 मिनिटे खेळला तरी खेळाडूमध्ये मानसिक पातळीवर आपोआप बदल होतात आणि आपोआपच आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ निवडण्याकडे त्यांचा कल होतो. परिणामी हळूहळू पण निश्चितपणे खाण्याच्या सवयीत बदल होऊ लागतो. या संशोधकांनी 41 वयस्कर पण स्थूल लोकांना 10 मिनिटे 4 वेळा हा ऑनलाईन गेम खेळण्यास सांगितले. त्यात त्यांच्या कॅलरी इनटेकमध्ये घट झाल्याचे आणि वजनही थोडे फार उतरल्याचे दिसून आले.