गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 19 जुलै 2014 (13:09 IST)

वाय-फाय यंत्रणेला ‘लाय-फाय’चा पर्याय

मेक्सिकन सॉफ्टवेअर कंपनीने ऑडिओ, व्हिडिओ व इंटरनेट डेटा ट्रान्सफरसाठी नवे तंत्र शोधून काढले आहे. हे डेटा ट्रान्सफर एलईडी लाइट तंत्राच्या माध्यमातून होणार असून प्रती सेंकद डेटा ट्रांसफरचा दर 10 गिगाबाइट्स असणार आहे.

या तंत्राचे नाव लाय-फाय (लाइट फिडॅलिटी) आहे. या तंत्राच्या कक्षेत येणार्‍या प्रत्येक गॅजेटवर इंटरनेट अँक्सेस देणे शक्य होणार असून मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणे सोपे होईल. वाय-फायला सक्षम पर्याय म्हणून लाय-फाय असून त्याचा वेगही जबरदस्त आहे. एलईडीद्वारे डेटा वहन करण्यात येईल.

प्रकाशाच्या वेगामुळे याचा वेगही वायर्ड वाय -फायपेक्षा जास्त असेल, असे मेक्सिकोच्या सिसॉफ्टचे कार्यकारी प्रमुख अटरूरो कॅम्पॉस फेंटानेस यांनी सांगितले. डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही.

रुग्णालयांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नल्समध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चिक नसून इंटरनेटचा वेग 5000 टक्क्यांनी वाढणार आहे.