गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (12:19 IST)

व्हॉटस्अँपवर होऊ शकते तुमची फसवणूक

आजपर्यंत फेसबुक, ट्विटर किंवा जीमेल अकाउंट हॅक होत होते पण आता तुमचं व्हॉट्सअँप देखील सुरक्षित नाही. व्हॉटस्अँप वापरताना आता तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. व्हॉटस्अँप वापरणार्‍या व्यक्तीची वैयक्तिक माहिती काढून घेतली जाऊ शकते. जर तुम्हाला कोणी एखादी लिंक पाठवली तर लिंक तुम्हाला एका डिस्काऊंट पेजवर नेते आणि तुम्ही ऑफरसाठी तेथे विचारलेली माहिती भरता. माहिती भरल्यानंतर तुम्हाला बनावट वेबसाईटवर नेले जाते, तेथे तुमच्या फोनला मालवेअरचा फटका बसतो आणि तुमची महत्त्वाची माहिती लीक होते. व्हॉटस्अँप आज जवळपास एक अब्ज लोक वापरत आहेत. त्यामुळे येथे फसवणूक करणार्‍यांची संख्या देखील वाढतांना दिसतेय. व्हॉटस्अँपवर जर तुम्हाला ऑफरचे किंवा इतर काही संशयास्पद मेसेजेस वाटले तर त्यावर क्लिक करू नका.