बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2015 (12:40 IST)

शाओमीच्या सेलमध्ये केवळ 1 रुपया गॅजेटस्

सणासुदींच्या दिवसांमध्ये ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरील सेल असणं आता काही नवीन राहिलेलं नाही. मात्र, आता या स्पर्धेत चिनी मोबाइल कंपनी शाओमीनेही उडी घेतली आहे. शाओमी आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर्स आणणार आहे. या ऑफरमध्ये miचे प्रोडक्ट केवळ 1 रुपयात खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये mi बँण्ड, पॉवर बँकचा समावेश आहे. या ऑफरमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार नाही. मात्र काही गॅजेट नक्की मिळतील. शाओमी इंडिया हेड मनू जैन यांनी या सेलची माहिती देताना सांगितले की, शाओमीच्या फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात अनेक शानदार डिव्हाइस खरेदी करता येतील. याआधी शाओमी इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून या सेलबाबत संकेत दिले आहेत. दिवाळी सणानिमित्त शाओमी आपल्या ग्राहकांना आपल्या अनेक प्रोडक्टवर मोठय़ा प्रमाणात सूट देऊ शकते. कंपनीच्या mi.com वेबसाईटवर प्रोडक्ट उपलब्ध असतील. शाओमीचे प्रोडक्ट फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या साईटवरही विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये शाओमी mi4i 9,999 रुपयाला उपलब्ध आहे. तर शाओमीच्या mi pad वर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यानंतर याची किंमत 9,999 रु. आहे.