गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (12:04 IST)

सावधान! मोबाइलमुळे कॅन्सरचा धोका!

मोबाइलनं जग इतकं व्यापलंय की, मोबाइलशिवाय जगणं अवघड झालं आहे. मोबाइल नसला तर अपंगत्व वगैरे आल्यासारखं वाटावं अशी परिस्थिती आहे. एकंदरीत काय तर मोबाइल इज एव्हरीथिंग. पण याच मोबाइलमुळे अनेक दुर्धर आजारांचा धोकाही आहे. एका अभ्यासानुसार मोबाइलसारख्या वायरलेस डिव्हाईसच्या रेडिएशनमुळे निर्माण होणार्‍या मेटाबॉलिकमुळे युजर्स किंवा इतरांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. या रेडिएशनमुळे न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजार किंवा कॅन्सर होण्याची भीती आहे. रिसर्च जर्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक बायोलॉजी अँड मेडिसीनमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी फॉर फूडचे संशोधक आयगर याकीमेंको यांनी दिलेल्या माहितीनुसार रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनपासून (आरएफआर) होणार्‍या ऑक्सीडेटिव्ह तणावामुळे केवळ कॅन्सरचा धोका नाही तर डोकेदुखी, थकवा जाणवण्याचीही शक्यता अधिक असते. मोबाइलमधून निघणार्‍या रेडिएशनमुळे माणसांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो हे स्पष्ट आहे, अशी माहिती आयगर यांनी दिली. 2011 साली कॅन्सरवर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय संस्थेनेही आरएफआरमुळे माणसांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे.