शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2016 (12:21 IST)

सुरक्षितपणे मोबाइलमधून सोने काढणे झाले शक्य

भंगारात गेलेल्या मोबाइलमधील सोने काढून घेण्याची प्रक्रिया आता सहजसुलभ व सुरक्षित बनली असल्याचा दावा युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमधील संशोधकांच्या पथकाने केला आहे. 
 
त्यांनी नव्याने विकसित केलेल्या पद्धतीमध्ये सोने काढणे अधिक सुरक्षित झाले असल्याचे टीमचे प्रमुख प्रो. जेसन लव यांनी सांगितले. यामुळे दरवर्षी अशा गॅजेटमध्ये वापरले जात असलेले 300 टन सोने परत मिळविणे शक्य होणार आहे.
 
मोबाइल अथवा संगणक, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविताना त्यात सोन्याचा वापर केला जातो हे आता सर्वाना ज्ञात आहे. जगातील एकूण सोन्याच्या सात टक्के सोन्याचा वापर या कारणासाठी केला जातो. 
 
अर्थात हे सोने इलेक्ट्रिक वेस्ट मध्ये जाते. अनेक कंपन्या रिसायकलिंग करून हे सोने बाहेर काढण्याचे काम करतातही. मात्र ही सारीच प्रक्रिया धोकादायक असते कारण यामध्ये आजपर्यंत सोने विरघळविण्यासाठी सायनाईड अथवा पार्‍यासारख्या विषारी पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे सोने वेगळे केल्यानंतरही जे वेस्ट राहते त्यात शिशासारख्या विषारी धातूचे प्रमाण वाढते. परिणामी ते आरोग्यासाठी धोकादायक बनते. नव्या प्रक्रियेत 
 
मोबाइल सर्किटमधील सोने वेगळे करताना मोबाइल सौम्य अँसिडमध्ये टाकला जातो. त्यामुळे मोबाइलमधील धातू विरघळतात. नंतर त्यात संयुक्त रसायन घातले जाते. हा तेलासारखा पदार्थ असतो. 
 
यामुळे या मिश्रणातील फक्त सोने वेगळे होते. त्यात कोणतीही विषारी रसायने वापरली जात नसल्याने ही पद्धत कमी खर्चिक व कमी धोक्याची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.