शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (16:52 IST)

सेल्फी घेतल्याने पसरतात उवा!

रशियाच्या सरकारी एजेंसीने तरुणांना उवांपासून बचाव करण्यासाठी सेल्फी न घेण्याचा सल्ला दिला आहे.   
सरकारी एजेंसी रोसपोत्रेब्नादज़रचे क्षेत्रीय विभाग कु्र्स्कनुसार लोकांमध्ये सेल्फी घेण्याचे चलन वाढल्यामुळे उवांची समस्या वाढत आहे. ही  संस्था लोकांना उत्तम जीवन कसे घालवायचे अशी सल्ला देते. संस्थेनुसार एक-दुसर्‍यांना खेटून सेल्फी काढताना उवांना एक दुसर्‍यांच्या डोक्यात जाणे सोपे होते. संस्थेद्वारे अशी चेतावणी देण्यात आली आहे की डॉक्टरांनी त्या मुलांना शाळेत जाण्याची मनाई केली आहे ज्यांच्या डोक्यात उवा आहेत.
विवादित सल्ला  
जग भरात तरुणांमध्ये सेल्फी घेण्याचे चलन वाढत आहे.  
रोसपोत्रेब्नादज़र ने दिलेल्या बर्‍याच सल्लांवर अगोदरही विवाद झाले आहे. या एजेंसीचे माजी प्रमुख जेन्नैडी ओनिश्चेंकोने एकदा कावळ्यांना मारण्याचा सल्ला दिला होता कारण हे पंख असणारे भेड़िए आहे जे बर्ड फ्लू पसरवतात.
त्यांनी त्या देशांच्या पेय आणि खाद्य पदार्थांवर प्रतिबंध लावला होता ज्यांचे रशियाचे राजनैतिक संबंध चांगले नव्हते.  
उवांबद्दल देण्यात आलेल्या सल्लांमुळे संस्थेचा रशियाच्या सोशल मीडियावर मज़ाक उडवण्यात येत आहे.  
लेंटा वेबसाइटवर जॉर्ज क्लोचकोव यांची टिप्पणी आहे, की जास्तकरून रुसी युवांच्या डोक्यात उवा आहेत.