बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (11:14 IST)

स्टार मेसेज आणि लिंक प्रीव्ह्यू, व्हॉटस्अँपचे नवे फीचर्स

व्हॉटस्अँपचे नवे अपडेट सुरु झाले असून यात स्टार मेसेज आणि लिंक प्रीव्ह्यू असे फीचर लॉन्च करण्यात आले आहेत. या नव्या व्हर्जनचं अपडेट अँड्रॉईड युझर्स डिव्हाईसवरही अपडेट झाले आहेत. या फीचरमुळे युझर्स त्यांचे महत्त्वाचे आणि खास मेसेज स्टार करुन नंतर वाचण्यासाठी स्टोअर करु शकतात. हे फीचर जीमेलच्या फीचरसारखंच आहे, ज्यात एखादा खास मेलला स्टार मार्क करण्याचा ऑप्शन असतो.
 
उदाहरणार्थ एखाद्या ग्रुपवर तुमच्याबद्दल काही चर्चा सुरु असेल तर तुम्ही त्या मेसेजला स्टार मार्क करु शकता. नंतर तुम्ही स्टार्ड सेक्शनमधून ते वाचू शकतात. या फीचरप्रमाणेच आणखी एक फीचर अपडेट करण्यात आलं आहे. ते म्हणजे लिकं प्रीव्ह्यू एखाद्या बातमीची लिंक शेअर केल्यानंतर आता त्या लिंकमधील काही मजकूर दिसणार आहे. लिंक प्रीव्ह्यूमुळे युझर्सला त्या लिंकमधील प्राथमिक माहिती दिसणार आहे. 
 
सर्वात आधी तुम्ही व्हॉटस्अँपचं व्हर्जन चेक करुन घ्या, जर अपडेटचा ऑप्शन असेल तर ते अपडेट करावं. जर हा ऑप्शन मिळाला नाही तर ही पद्धत वापरा. व्हॉटस्अँपच्या अधिकृत वेबसाईट (http://www.whatsapp.com/android/ ) वर जा. इथून व्हॉटस्अँपचं नवं व्हर्जन 2.12.342 डाऊनलोड करा. यानंतर तुमच्या अँडॉईड डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल करा.