गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (10:01 IST)

स्वस्त स्मार्टफोन खरेदी करु नका

मोबाइल बाजारात सध्या स्वस्त स्मार्टफोनची चांगलीच चलती आहे. त्यामुळे अनेक नवनवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच होत आहेत. अनेक चिनी कंपन्यांसोबत भारतीय कंपन्याही असे स्मार्टफोन लाँच करीत आहेत. मात्र, यामुळे मोबाइल प्रेमी अनेकदा बुचकळ्यात पडतात. 
 
स्मार्टफोनमधील तेच फीचर काही कंपन्या रु. 10,000 मध्येही देतात. तर दुसरीकडे सॅमसंग, एचटीसी, एलजी, अँपल यासारख्या कंपन्या त्यासाठी दुप्पट किंमत आकारतात. 13 मेगापिक्सल, 2 जीबी रॅम, ऑक्टा-कोअर प्रोसेसर या फीचर्ससह कोणत्याही स्मार्टफोनची किंमत जवळपास 20 ते 25 हजारांच्या आसपास असू शकते. मात्र, आज काल तुम्हाला असे स्मार्टफोन 5 ते 8 हजारांमध्येही उपलब्ध आहेत. मात्र, आपण असा अजिबात विचार करु नका की, तुमच्याकडून दुप्पट किंमत घेतली जात आहे. किंबहुना स्वस्त फोन घेताना तुम्ही एक प्रकारे तडजोड करीत आहात. मोबाइलचे स्वस्त पार्ट आणि चिप यामुळे कमी बजेटचे स्मार्टफोन बाजारात पाहायला मिळत आहेत. यामुळेच या स्मार्टफोनच्या किमती कमी असतात. मोबाइल डिव्हाइसमध्ये सॉफ्टवेअर हा एक प्रमुख घटक असतो. जर तुमच्या स्मार्टफोनचा सॉफ्टवेअर कमकुवत असल्यास त्यातून डेटा चोरी होण्याची शक्यता फारच बळावते. तसेच सॉफ्टवेअर पॅच अपडेट होताना अनेकदा अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे कॅमेरा क्वॉलिटीमध्येही फरक पडतो. कारण की यामध्ये चांगल्या लेन्स आणि कंपोनेंटचा वापर करण्यात आलेला नसतो.