मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (12:00 IST)

‘नो पार्किंग’वरून गेलेल्या गाड्यांची माहिती देणार ‘व्हॉटस् अँप’!

भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल.. त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉटस् अँपनं पुढाकार घेतलाय.

ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यातून गाडी उचलून नेली असल्यास त्या ठिकाणी खडूने गाडी कुठे नेली, याची माहिती लिहिली जाते. मात्र दिल्ली वाहतूक पोलिसांनी यावर उपाय काढला आहे. गाडी कुठे नेली याची माहिती पोलिसांच्या व्हॉटस् अँपच्या (8750871493) या क्रमांकावर मेसेज करून मिळवता येणार आहे. तसेच, येण्यासाठी जवळ असलेल्या रस्त्याचीही माहिती देण्यात येणार आहे.

व्हॉटस् अँप आजकाल अनेक मोबाइलवर दिसणारं अँप्लिकेशन आहे. याच अँपची लोकप्रियता लक्षात घेता त्यावरच ही माहिती उपलब्ध करून देण्याची शक्कल लढवलीय, अशी माहिती विभागाच्या विशेष पोलीस आयुक्तांनी दिली. लोकांच्या तक्रारी आणि शंकांचं निरसन करण्यासाठीही पोलिसांची हेल्पलाइन सुरू आहे.