testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जन्माष्टमी संदेश

krishna
वेबदुनिया|
पाप आणि दु:खाने भरगच्च भरलेल्या या जगात कृष्णाने पदार्पण केले. ते केवळ एक महान संदेशच घेऊन आले असे नाही तर एक नवीन सृजनशील जीवन घेऊन आले होते. मानवाच्या प्रगतीत एक नवीन युग स्थापित करण्यासाठी आले होते. या जीर्ण झालेल्या भूमीवर एक स्वप्न घेऊन आले होते. जन्माष्टमीच्या दिवशी त्या स्वप्नाच्या स्मृतीनिमित्त महोत्सव साजरा केला जातो. या तिथीला पवित्र मानणारे असे किती जण आहेत जे या नश्वर जगात त्या दिव्य जीवनाच्या अमर स्वप्नाला प्रत्यक्षात आणू पाहतात.
गोकुळ आणि वृंदावनात मधुर मुरलीच्या मोहक स्वरात आणि कुरूक्षेत्र या युद्धक्षेत्रात (गीतेच्या रूपात) सृजनशील जीवनाचा तो संदेश सांगितला गेला. रणांगणात अर्जुनाला मोह झाला. नात्यांच्या जंजाळात अडकलेल्या अर्जुनला त्याने या भवसागरातून बाहेर येण्यास सांगितले. त्याला त्याच्या कर्तव्याची व कर्माची जाणीव करून दिली. व्यष्टीपासून समष्टी अर्थात सनातन तत्त्वाकडे जाण्याचा उपदेश केला. तेच सनातन तत्त्व म्हणजे आत्मा होय. 'तत्त्वमसिए'!

मनुष्य- ! तू आत्मा आहेस! परमात्मा प्राण आहे! मोहाने बांधलेला ईश्वर आहे! चौरासीच्या प्रेमात पडलेले चैतन्य आहे! हेच गीतेच्या उपदेशाचा सार नाही का? माझ्या प्रिय बांधवांनो! आपण सर्व शांतीपासून अशांतीकडे वाटचाल तर करीत नाही ना? तुम्ही देवाचा शोध घेत नाही का? असे असल्यास आपल्या ह्रदयात शोधा! तिथेच तुम्हांला हा प्रियतम मिळेल.

krishna
WD
भगवान श्रीकृष्णाचे वैभवमंडल
कोण आहे? जो तीक्ष्ण आहे, तोच श्रीकृष्ण आहे. जे भगवान श्रीकृष्णाच्या बासरी आणि सुदर्शन चक्रात अंतर आहे तेच अंतर ब्रजभूमी आणि कुरूक्षेत्रात आहे. सृजनशीलता आणि विनाश सृष्टीची गती आहे. श्रीकृष्णाचे मुरलीधारी रूप सृष्टीच्या रागाला बांधून ठेवते, तर सुदर्शनधारी विराट रूप सृष्टीच्या नश्वरतेचे भान ठेवते. कृष्ण स्वत: एक गुप्त खजिना आहे. असीम वैभवा त्यांच्या विचारांमध्ये आहे. आपले हे रूप पाहण्यासाठी कृष्णाने परमेश्वर-रूपी सृष्टी निर्माण केली.


यावर अधिक वाचा :

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राहू-शनीचा कुप्रभाव

national news
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या

national news
13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण ...

राशिभविष्य