शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

जन्माष्टमी संदेश

पाप आणि दु:खाने भरगच्च भरलेल्या या जगात कृष्णाने पदार्पण केले. ते केवळ एक महान संदेशच घेऊन आले असे नाही तर एक नवीन सृजनशील जीवन घेऊन आले होते. मानवाच्या प्रगतीत एक नवीन युग स्थापित करण्यासाठी आले होते. या जीर्ण झालेल्या भूमीवर एक स्वप्न घेऊन आले होते. जन्माष्टमीच्या दिवशी त्या स्वप्नाच्या स्मृतीनिमित्त महोत्सव साजरा केला जातो. या तिथीला पवित्र मानणारे असे किती जण आहेत जे या नश्वर जगात त्या दिव्य जीवनाच्या अमर स्वप्नाला प्रत्यक्षात आणू पाहतात.

गोकुळ आणि वृंदावनात मधुर मुरलीच्या मोहक स्वरात आणि कुरूक्षेत्र या युद्धक्षेत्रात (गीतेच्या रूपात) सृजनशील जीवनाचा तो संदेश सांगितला गेला. रणांगणात अर्जुनाला मोह झाला. नात्यांच्या जंजाळात अडकलेल्या अर्जुनला त्याने या भवसागरातून बाहेर येण्यास सांगितले. त्याला त्याच्या कर्तव्याची व कर्माची जाणीव करून दिली. व्यष्टीपासून समष्टी अर्थात सनातन तत्त्वाकडे जाण्याचा उपदेश केला. तेच सनातन तत्त्व म्हणजे आत्मा होय. 'तत्त्वमसिए'!

मनुष्य- ! तू आत्मा आहेस! परमात्मा प्राण आहे! मोहाने बांधलेला ईश्वर आहे! चौरासीच्या प्रेमात पडलेले चैतन्य आहे! हेच गीतेच्या उपदेशाचा सार नाही का? माझ्या प्रिय बांधवांनो! आपण सर्व शांतीपासून अशांतीकडे वाटचाल तर करीत नाही ना? तुम्ही देवाचा शोध घेत नाही का? असे असल्यास आपल्या ह्रदयात शोधा! तिथेच तुम्हांला हा प्रियतम मिळेल.

  WD
भगवान श्रीकृष्णाचे वैभवमंडल
श्रीकृष्ण कोण आहे? जो तीक्ष्ण आहे, तोच श्रीकृष्ण आहे. जे भगवान श्रीकृष्णाच्या बासरी आणि सुदर्शन चक्रात अंतर आहे तेच अंतर ब्रजभूमी आणि कुरूक्षेत्रात आहे. सृजनशीलता आणि विनाश सृष्टीची गती आहे. श्रीकृष्णाचे मुरलीधारी रूप सृष्टीच्या रागाला बांधून ठेवते, तर सुदर्शनधारी विराट रूप सृष्टीच्या नश्वरतेचे भान ठेवते. कृष्ण स्वत: एक गुप्त खजिना आहे. असीम वैभवा त्यांच्या विचारांमध्ये आहे. आपले हे रूप पाहण्यासाठी कृष्णाने परमेश्वर-रूपी सृष्टी निर्माण केली.