गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत

WD
असुरांचा अत्याचार वाढला आणि धर्माचे पतन झाले त्यावेळी देवाने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेत भगवान कृष्णाने अवतार घेतला. म्हणूनच या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमीच्या रूपात साजरे केले जाते. या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जन्माष्टमी व्रत केले जाते.

व्रत-पूजन असे करावे

1. उपवासाच्या पहिल्या रात्री हलकेसे जेवण करा आणि ब्रह्मचर्याचे पालन करा.
2. उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान संध्या उरकून आपल्या दररोजच्या कामातून निवृत्त व्हा.
3. सूर्य, सोम, यम, काल, संधी, भूत, पवन, दिक्पती, भूमी, आकाश, खेचर, अमर आणि ब्रह्मदेवाला नमस्कार करा किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा.
4. यानंतर जल, फळ, कुश आणि गंध घेऊन संकल्प करा आणि खालील मंत्र म्हणा.
ममखिलपापप्रशमनपूर्वक सर्वाभीष्ट सिद्धये
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रतमहं करिष्ये।।
5. आता मध्यान्हाच्या वेळी काळ्या तिळाने स्नान करून देवकीसाठी 'सुतिकागृह' करा.
6. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
7. मूर्तीत बालक श्रीकृष्णाला स्तनपान करणारी देवकी आणि लक्ष्मीचे चरण स्पर्श केलेले असावेत किंवा तसा भाव चित्रात असावा.
8. यानंतर पूजा करा.
9. पूजेत देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांची नावे क्रमाने लिहिलेली असावीत.
10. नंतर खालील मंत्राने पुष्पांजली अर्पण करा.
'प्रणमे देव जननी त्वया जातस्तु वामन:।
वसुदेवात तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम:।
सुपुत्रार्घ्य प्रदत्तं में गृहाणेमं नमोऽस्तु ते।'
11. शेवटी प्रसाद वाटून भजन, कीर्तन करून रात्री जागर करा.