शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By

श्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ...

महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा युधिष्ठरचे राज्याभिषेक होत होते तेव्हा कौरवांची आई गांधारीने महाभारत युद्धाला श्रीकृष्णाला दोषी ठरवत श्राप दिला की ज्या प्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला आहे त्याच प्रकारे यदुवंशाचा देखील नाश होईल. श्रापामुळे श्रीकृष्ण द्वारका परतून यदुवंशियांना घेऊन प्रभास क्षेत्रात आले. काही दिवसांनंतर महाभारत-युद्धाची चर्चा करत सात्यकी आणि कृतवर्मामध्ये विवाद झाला.  
 
सात्यकीने रागात येऊन कृतवर्माचे शिर कापले. यामुळे त्यांच्यातील युद्ध भडकले आणि ते समूहात विभाजित होऊन एक-दूसर्‍याचा संहार करू लागले.   
 
नाही झाला होता यदुवंशाचा नाश : या युद्धात श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि मित्र सात्यकी समेत किमान सर्व यदुवंशी मरण पावले होते, फक्त बब्रु आणि दारूक शेष राहिले होते. ज्यांनी नंतर यदु वंशाला पुढे वाढविले.  
श्रीकृष्णाच्या मृत्यूचा रहस्य: द्वारकेला त्यांनी आपले निवास स्थान बनवले आणि सोमनाथाजवळ प्रभास क्षेत्रात आपले देह सोडले. महत्त्वाचे म्हणजे कृष्ण याच क्षेत्रात आपल्या कुलाचा नाश बघून फारच व्यथित झाले होते. ते तेव्हापासूनच तेथेच राहू लागले होते. एक दिवस ते एका वृक्षाखाली आराम करत होते तेवढ्यात एका शिकारीने त्यांना हिरण समजून तीर सोडला. हा तीर त्यांच्या पायाला जाऊन लागला आणि तेव्हाच त्यांनी देह त्यागायचा निर्णय घेतला.  
 
जनश्रुति म्हणते की एक दिवस ते या प्रभाव क्षेत्रात जंगलामध्ये पिंपळाच्या झाडाखाली योगनिद्रेत आराम करत होते, तेव्हाच ‘जरा’ नावाचा एका शिकारीने चुकून त्यांना हिरण समजून विषयुक्त बाण चालवला, जो त्यांच्या तळपायाला लागला आणि श्रीकृष्णाने यालाच निमित्त बनवून देह त्यागली. पण ही त्यांची एक लीला होती.  
 
वानर राज बालीच होता जरा शिकारी : पौराणिक मान्यतेनुसार प्रभूने त्रेतायुगात रामाच्या रूपात अवतार घेऊन बालीला लपून तीर मारले होते. कृष्णावताराच्या वेळेस देवाने त्याच बालीला जरा नावाचा शिकारी बनवले आणि आपल्यासाठी तशीच मृत्यू निवडली जशी बालीला दिली होती.