शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

सुदर्शनचक्र

ND
व्युत्पत्ती व अर्थ : सुदर्शन हा शब्द सु + दर्शन असा बनला आहे. त्याचा अर्थ असा की, ज्याचे दर्शन `सु' म्हणजे शुभदायक आहे असे. चक्र हा शब्द चृ: (हालचाल) व कृ: (करणे) असा बनला आहे; म्हणून चक्र म्हणजे हालचाल करणारे. सर्व आयुधांत हे एकच आयुध सतत गतिमान असते.

वैशिष्ट्ये
१. सुदर्शन चक्र सर्वसाधारणपणे कृष्णाच्या करंगळीवर, तर विष्णूच्या तर्जनीवर असते. चक्र फेकतांना कृष्णही ते तर्जनीनेच फेकीत असे.
२. चक्र फेकल्यावर शत्रूचा नाश करून ते फेकणार्‍याकडे परत येते.
३. ते फेकल्यावरही फेकणार्‍याचा त्याच्यावर सतत ताबा असतो.
४. ते शून्यमार्गातून जाते, म्हणून क्षणात कोठेही जाऊ शकते.
५. अडथळा आला की, चक्राची गती वाढते. याला `ह्रंसगती' म्हणतात.
६. त्याचा आवाज होत नाही.
७. याचा आकार तुळशीच्या एका पानाच्या टोकावर बसेल एवढा लहान व त्याचबरोबर विश्‍व व्यापेल एवढा मोठा आहे.
८. महाभारत