शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (17:01 IST)

मला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले : आठवले

मला राज्यसभा देण्याचे आश्वासन दिले गेले आहे तसेच एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ देण्याचा आश्वासन दिले गेले असल्याचे सामाजिक न्याय व विकास मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुलुंडमधील भीम महोत्सव या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रामदास आठवले आले होते. त्यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत युतीत असलेल्या रामदास आठवलेंना उमेदवारी मिळण्याची आशा होती. पण भाजपा आणि सेनेत झालेल्या उमेदवारीच्या वाटाघाटीत रामदास आठवलेंना स्थान दिले नाही. त्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी होते. 
 
मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याने मी नाराजी न ठेवता पुन्हा प्रचाराला लागलो आहे अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. 'राजकारणात काम करायचं असतं तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही असेही ते म्हणाले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.