गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरोधात उभे असलेल्या कांचन कुल आहेत तरी कोण जाणून घ्या

भाजपकडून शरद पवार यांचा एक हाती वर्चस्व असलेल्या  बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उभे केले आहे.  तर  कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. कांचन या  पवार कुटुंबीयांच्या अर्थात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नात्यातील देखील आहेत.

कांचन कुल दौंडमध्ये  सक्रिय असून, तेथील विविध कार्यक्रमात त्या हजेरी लावत असतात.  त्यांचे पती राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी असून,  2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत राहुल कुल यांनी माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचा पराभव केला होता.  त्यामुळे आता सुळे विरोधात कुल असे चित्र स्पष्ट असून बारामतीची जनता कोणाला निवडणून देणार आणि कांचन या पवारांना किती मोठा धक्का देतील हे निकालावरून दिसून येईल.