testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाणीच नाही मग आम्ही मतदान करयच कुणाला - पुणेकरांचा गिरीश बापट यांना प्रश्न

girish bapat
Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:58 IST)
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. सध्या छोट्या छोट्या सभा घेऊन उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, याचा पहिला मोठा फटका पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना बसला आहे. मागील पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बापट पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत होते, यावेळी जमलेल्या नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं होते.

आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस, महिने झगडतो आहोत अर्ज देत आहोत मात्र कोणतीच कारवाई होत नाही, आमच्या परिसरात आम्हाला पाणीच मिळत नाही, पुणे स्मार्ट शहर होतय तरी हे प्रश्न आहेत, मग
आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला आहे. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे येथे अनेक दिवसांपासून पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, या आगोदर देखील अनेक प्रकारे पुण्यातील लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोडावर सुद्धा प्रश्न बाकी आहेत त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न मोठा मुद्द्दा होणार आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

जिवंत पुरलेल्या बाळाला कुत्र्यानं काढलं शोधून

national news
कुत्रा हा मानवाचा सर्वांत जवळचा मित्र आहे असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय हा वेळोवेळी ...

होमोफोबिया म्हणजे काय, तो बरा होणं खरंच शक्य आहे का?

national news
एखाद्याची लैंगिकता बदलण्याची कल्पना विज्ञानानं कधीच फेटाळून लावली आहे.

इंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का? - ...

national news
भारतीय युवक काँग्रेसच्या युवा देश या ऑनलाईन मासिकाने नुकतंच एक ट्वीट केलं. माजी पंतप्रधान ...

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते :

national news
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षारक्षकाने केली होती, तसंच मला सुरक्षा ...

मतदानाचा सातवा टप्पा, मोदींसह अनेक हाय-प्रोफाईल उमेदवार ...

national news
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. सातव्या टप्प्यात ...