शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 10 डिसेंबर 2018 (15:47 IST)

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला दिले आमंत्रण

खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर घेण्यासाठी आयआयटीमुंबईच्या बेटीक विभागाला दिलेआमंत्रण
 
‘आयुलिंक स्टेथस्कोप’ आणि ‘डायबेटिक फूटस्क्रीनर’ ही बेटीकची उत्पादने देऊ शकतात तत्काळ लाभ
 
बायोमेडिकल इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीइनक्युबेशन सेंटरच्या (BETiC / बेटीक)भारतभरातील १३ इनोव्हेशन केंद्रांनी आतापर्यंत ४०नवीन व परवडण्याजोगी वैद्यकीय उपकरणे तयार केलीआहेत. बेटीकच्या केंद्रांपैकी एक केंद्र आयआयटी-मुंबईयेथे आहे.
 
प्राध्यापक बी. रवी यांच्या ‘द इसेन्स ऑफ मेडिकलडिव्हाइस इनोव्हेशन’ या पुस्तकामध्ये अशा १६ गाथाआहेत. हे पुस्तक क्रॉसवर्ड बुकस्टोअरचे प्रकाशनविभाग- द राइट प्लेस तर्फे प्रकाशित करण्यात आलेआहे.
 
आयआयटी मुंबईमधील बायोमेडिकल इंजिनीअरिंगअॅण्ड टेक्नोलॉजी इनक्युबेशन सेंटर (बेटीक) चे प्रमुखप्रा. बी. रवी आणि वर्ल्ड डिग्निटी फोरमच्या निमंत्रकमीनू मारिएल यांनी या पुस्तकावर चर्चा केली. बेटीक लामहाराष्ट्र सरकार व भारत सरकारचे पाठबळ आहे.
 
माननीय लोकसभा खासगार तसेच भारतीय जनता युवामोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.
 
‘अब्जावधी भारतीयांसाठी कमी दरातील वैद्यकीयउपकरणे’ या विषयावर यावेळी चर्चा झाली. टाइम्स ऑफइंडियाचे वरिष्ठ सल्लागार विठ्ठल नाडकर्णी यांनी याचर्चासत्राचे नियमन केले.
 
“बेटीकमध्ये आम्ही कल्पना, नावीन्यता, चाचणी व प्रभावअशा सर्व टप्प्यांतून जाणारा प्रवास करतो,” असे प्रा. रवीम्हणाले. “बेटीकमधील आमच्या अनुभवावरून असेलक्षात आले की हे भारतात शक्य आहे. डॉक्टरांनीमिळवून दिलेली बाजारपेठ, संशोधकांनी विकसितकेलेले तंत्रज्ञान आणि सरकारने उद्योजकांसाठी तयारकेलेले अनुकूल वातावरण या घटकांना याचे श्रेय द्यावेलागेल.”
यातील काही उत्पादने पुढीलप्रमाणे-
 
१. स्मार्ट स्टेथोस्कोप (आयुलिंक)- यामुळेदुर्गम भागातील डॉक्टरांना हृदय तसेचछातीतील ध्वनी रेकॉर्ड करून ते प्रादेशिकरुग्णालयांतील डॉक्टरांकडे सेंकड ओपिनियनआणि निदानासाठी पाठवणे शक्य होते. पहिल्याटप्प्यात भावनगरमधील १० प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये हे स्टेथोस्कोप्स देण्यात आले आहेत. 
 
२. डायबेटिक फूट स्क्रीनर - भारतामध्येमधुमेहाचे ६० दशलक्ष रुग्ण आहेत आणिदरवर्षी ६० दशलक्ष लोकांना अॅम्प्युटेशन अर्थातअवयव काढून टाकण्याच्या समस्येला तोंड द्यावेलागते. बीईटीआयसी/ बेटीक ने विकसितकेलेला ‘डायबेटिक फूट स्क्रीनर’ दूरवर कामकरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना उपयोगी पडतो. यामुळे रुग्णांमधील अल्सरेशन व अम्प्युटेशनरोखण्यात मदत होते. हे उपकरण पाऊलाच्यातळव्यातील उतींच्या ताठरपणावरून निदानकरते आणि त्यावरून रुग्णांचे वर्गीकरण हिरव्या, पिवळ्या आणि लाल अशा धोक्याच्या क्षेत्रांतकेले जाते. त्यानुसार उपचार सुचवले जातात. ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरणवापरण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
 
३. हायब्रिड प्लास्टर स्प्लिंट-  अपघातानंतरशरीरातील दुखापतग्रस्त अवयव एकमेकांनाधरून राहावेत यासाठी हे एक साधे मिश्रणआहे. यामुळे रुग्णालयापर्यंतच्या प्रवासातहोणारे नुकसान टाळता येते. हे उपकरण अत्यंतदुर्गम खेड्यांत वापरास उपयुक्त आहे.
 
चार वर्षांहून कमी काळात, बीईटीआयसी/ बेटीक ने(बायोमेडिकल इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीइनक्युबेशन सेंटर) राज्यांत १३ केंद्रांपर्यंत मजल मारलीआहे. या केंद्रांमधून १००हून अधिक डॉक्टर्स आणिइंजिनीअर्स एकत्रितपणे काम करत आहेत. अब्जावधीजनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी तेकाम करत आहेत.