शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (11:31 IST)

जंतूनाशक फवारणी : कोरोना व्हायरसपासून बचाव होईल की ठरेल धोकादायक?

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यांवर जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. परंतू यामुळे मानवी शरीरावर विपरित परिणाम होत असून विषाणूला चाप बसत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
 
कोविड-19 महामारी संदर्भात डब्ल्यूएचओने स्वच्छता आणि सतहला जिवाणूमुक्त करण्यासाठी गाइडलाइन जारी केली आहे. 
 
डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की बाजार, छोट्या गल्लया, झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छता आणि हवेतील धूलिकणांमुळे जंतूनाशक फवारणीचा काहीही उपयोग होत नाहीये. ही फवारणी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी परिणामकारक नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. उलट या फवारणीमुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे.
 
दुष्परिणाम
धूळ आणि अस्वच्छतेमुळे जंतूनाशक निष्क्रीय होऊ शकतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक दुखणी उद्भवू शकतात. हे रसायन डोळे आणि त्वचेसाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे त्वचेची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोळे जळजळ, आणि पोटाचे विकार अश्या समस्या उद्भवू शकतात. 
 
घरच्या आत जंतूनाशक वापरण्यावर देखील संघटनेने चेतावणी दिली आहे. जंतूनाशक वापरायचेच असल्यास याला कपड्याने भिजवून पुसायला हवे.
 
जगभरात तीन लाखाहून अधिक लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस सतह किंवा इतर कुठल्याही वस्तूवर आढळतो. तशी तर याबद्दल प्रमाणिक माहीत उपलब्ध नाही की कोरोना कोणत्या सतहवर किती काळ जिवंत राहू शकतो.