गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (15:56 IST)

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही तयार करत असल्याचे यामुळे भाषातंत्रामुळे गायीही तामिळ आणि संस्कृतमध्ये लवकरच बोलू शकतील असं त्यांनी म्हटलं आहे. स्वामी नित्यानंद यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वर्षभरात मी गाय, माकड आणि इतर प्राण्यांच्या तोंडून संस्कृत आणि तामिळ भाषा वदवून घेईन असा दावा ते व्हिडीओमध्ये करत आहेत. माकड आणि अन्य प्राण्यांना माणसांसारखे काही ऑर्गन नसतात. आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारचे इंनटर्नल ऑर्गन तयार करत आहे. संशोधन आणि विज्ञान मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. लवकरच प्राणी आणि व्यक्तीमध्ये तामिळ किंवा संस्कृतमध्ये संभाषण होईल असे म्हटले.