शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (09:22 IST)

यूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना

आधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. याची सुरूवात सिम कार्ड खरेदी प्रक्रियेपासून सुरू केली जाणार आहे. यासाठी प्राधिकरण सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करणार आहे.
 
या योजनेंतर्गत नवीन मोबाइल सिम घेण्यासाठी अर्जात लावण्यात आलेले छायाचित्र त्याच व्यक्तिला समोर बसवून घेण्यात आलेल्या छायाचित्राशी जुळवून पाहिली जाणार आहे. जी मोबाइल कंपनी १५ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता उर्वरित सत्यता पडताळणाऱ्या संस्थानांही याबाबत निर्देश देण्यात येतील. ‘लाइव्ह फेस फोटो’ आणि ‘इ केवायसी’दरम्यान घेण्यात आलेले छायाचित्र जुळवणे सक्तीचे राहणार आहे.