शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 10 डिसेंबर 2018 (13:53 IST)

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासाठी सीबीआय आणि अंलबजावणी संचालनालाचे संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई नोहर यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती.
 
यापूर्वी शुक्रवारी भारताच्या सुप्रीम कोर्टाने मल्ल्याला दणका देताना मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तर मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात कोर्टाने केंद्राचे मत मागवले आहे.
 
भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून मल्ल्या परदेशात पळाला असून ईडीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीला मल्ल्याची भारतातील मालमत्ता जप्त करायची असून फरार घोषित केल्याशिवाय त्याची मालमत्ता जप्त करता येणार नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ईडीने अर्ज केला आहे. यात मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मल्ल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. शेवटी या प्रकरणी मल्ल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.