testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देशात आचारसंहिता लागू; 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान

नवी दिल्ली| WD| Last Updated: गुरूवार, 6 मार्च 2014 (10:52 IST)
16 लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार होणार आहे. 16 मे रोजी निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त पी. व्ही संपथ बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता लागू करण्‍यात आली आहे.
यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत नऊ टप्प्यात मतदान होणार आहे. 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान हे मतदान होईल. 16 मे रोजी देशातील सर्व 545 मतदारसंघात मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 10, 17 आणि 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. याचवेळी निवडणूक आयोगाने तेलंगणा, सीमाध्रं, ओडिशा, सिक्कीम या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. देशातील हवामान व पावसाचा अंदाज घेऊनच वेळापत्रक तयार केल्याचे आयुक्त पी. व्ही संपथ यांनी सांगितले.
एक जून रोजी लोकसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे 31 मेपूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे.

10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली,
यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.

17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.

यंदा प्रथमच सर्वाधिक 81 कोटी 40 लाख मतदार मतदान करणार आहेत. यंदा 10 कोटी मतदार वाढले आहेत. याचबरोबर यंदा 18 ते 35 वयोगटातील सर्वाधिक मतदार आहेत.

नऊ टप्प्यांत होणा-या मतदानांसाठी एकूण 8 लाख मतदान केंद्रे असतील तर, 12 लाख मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) या बटणाचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार असल्याची माहिती संपथ यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची टप्पे:
पहिला टप्पा: 7 एप्रिल, 2 राज्ये, 6 मतदारसंघ
दुसरा टप्पा: 9 एप्रिल, 5 राज्ये, 7 मतदारसंघ
तिसरा टप्पा: 10 एप्रिल, 14 राज्ये, 92 मतदारसंघ
चौथा टप्पा: 12 एप्रिल, 3 राज्ये, 5 मतदारसंघ
पाचवा टप्पा: 17 एप्रिल, 13 राज्ये, 122 मतदारसंघ
सहावा टप्पा: 24 एप्रिल, 12 राज्ये, 117 मतदारसंघ
सातवा टप्पा: 30 एप्रिल, 9 राज्ये, 89 मतदारसंघ
आठवा टप्पा: 7 मे, 12 राज्ये, 64 मतदारसंघ
नववा टप्पा: 12 मे, 3 राज्ये, 41 मतदारसंघ
मतमोजणी: 16 मे ला (देशभरातील सर्व 545 मतदारसंघाची)


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

संभाजी भिडेंच्या व्याख्यानाला परवानगी नाहीच

national news
संभाजी भिडेंच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लालबागमध्ये रविवारी ...

क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये "जीत" प्रकल्प

national news
"जीत" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...

अवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार

national news
टी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...

दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

national news
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...

शरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...