बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: बार्शी , शनिवार, 8 मार्च 2014 (15:27 IST)

गायकवाड यांच्या प्रचाराला आज बार्शीतून सुरुवात

उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून कोण ही अनेक दिवसांपासूनची मतदारांची उत्सुकता अखेर संपली. शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या नावावर नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. गायकवाड हे लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आज (शनिवार) बार्शीतून करीत आहेत.
 
माढय़ानंतर उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. प्रा. गायकवाड यांचे नाव जाहीर झालनंतर या चर्चेवर शुक्रवारी पडदा पडला. उस्मानाबाद लोकसभेसाठी आघाडीचे डॉ. पद्मसिंह पाटील व महायुतीचे प्रा. गायकवाड यांच्यातील चुरस पाहण्यासारखी असेल. परंतु या रिंगणात आणखी उमेदवार उतरल्यास मतांची गणितेही बदलतील. तत्पूर्वी बार्शी तालुका या मतदारसंघात येत असल्याने आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजता प्रा. रवी गायकवाड हे बार्शीचे ग्रामदैवत भगवंताचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बार्शीत फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दीपक आंधळकर, नागजी नान्नजकर, बाबासाहेब कापसे, तालुकाप्रमुख काका गायकवाड, भाजपचे सुनील गोलकोंडा, जयगुरू स्वामी उपस्थित होते. 
 
मोठय़ा मताधिक्याने विजयी करू : आंधळकर
 
सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार प्रा. गायकवाड यांच्या माध्यमातून महायुतीने दिला आहे. या निवडणुकीत बार्शीतून मोठे मताधिक्य देत असताना त्यांच्या विजयातही महत्त्वाचा वाटा उचलू, असे बार्शी तालुक्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले.