testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नात्याला थोडा ताजेपणा देऊ या!

love station
वेबदुनिया|
WD
कोणतीही गोष्ट शाश्वत नसते असे म्हटले जाते. नात्याच्या बाबतीतही हे खरे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, ओढ, काळजी या सर्व भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. एकमेकांबद्दल क्षणोक्षणी विचार करणार्‍या पती-पत्नीचे एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे केवळ पती-पत्नीच्या बाबतीत नव्हे तर प्रियकर-प्रेयसीच्या बाबतीतही घडते. स्त्रिया जास्त भावूक असल्याने त्याचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम उरलेले नाही हा विचार त्यंना सतातवत राहतो. मात्र, नात्याचा हा तिढा कसा सोडवावा हे उमगत नाही. पतीचे आपल्यावरील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेले नसले तरी ते कमी झाले आहे, हे वारंवार जाणवते. अशा वेळी डोके धरुन बसण्यात काय अर्थ आहे?

चला, नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने माझ्यासाठी अमूक केले पाहिजे, ती माझी जबाबदारी नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाबीमध्ये दोघांनी समान वाटा उचलावा, म्हणजे एकावर दडपण येणार नाही. आणि एकमेकांच्या साथीने काम पूर्णही होईल.
स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते. त्या स्वत:ची गाडी पुढे दामटवण्यात इतक्या रमतात की समोरच्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. यामुळेही नात्यात दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा जोडीमाराचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...