गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

उत्कंठावर्धक ‘ड्रीम मॉल’

महिलांची सुरक्षा हा सध्या आपल्या देशातला अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील विषय बनला आहे. एकीकडे महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असताना त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांमुळे सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, हे लक्षात घेऊन निर्मात्या रेखा पेंटर यांच्या ‘व्हाईट लान पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेने ‘ड्रीम मॉल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नावाप्रमाणेच अनोख्या असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या मुंबईतील एका भव्य मॉलमध्ये सुरू आहे.

WD

ड्रीम मॉल’ ची संपूर्ण कथा केवळ एका रात्रीत घडते. सई नावाची 22 वर्षाची तरुणी एका मॉलमधल्या ऑफिसमध्ये काम करीत असते. एके दिवशी सईला ऑफिसमधून निघायला खूप उशीर होतो, तोपर्यंत मॉल बंद झालेला असतो. त्या प्रचंड मोठ्या मॉलमध्ये ती एकटीच अडकून पडते आणि सुरू होतो जीवघेणा खेळ. मानवी मनाची भीती आणि थरकाप या भावनांची ही अनुभूती हादरवणारी असते. आयुष्यात आलेली ही एक रात्र सईला कोणत्या वळणावर नेऊन सोडते हे गूढ रहस्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. ‘ड्रीम मॉल’चे लेखन-दिग्दर्शन सूरज दत्ताराम मुळेकर यांनी केले आहे, तर संगीत दिग्दर्शन साजन पटेल आणि अमेय नरे या जोडगोळीने केलं आहे. धनराज वाघ हे ‘ड्रीम मॉल’ चे सिनेमाटोग्राफर आहेत. या चित्रपटाचं तांत्रिक व्यवस्थापन ‘काईट्स सिने क्राफ्टस्’ यांनी केले आहे. विशेष म्हणजे निर्मात्यांनी कलाकारांची नावं गुप्त ठेवली आहेत.