बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

उन्हाळी सुटीत ‘चिंटू-२’ ची धमाल

PR
गेल्या वर्षीच्या प्रचंड यशानंतर बालचमूंचा लाडका छोटा दोस्त चिंटू आपल्या संपूर्ण गँगसह पुन्हा एकदा चिंटू २ खजिन्याची चित्तरकथा या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर येत आहे. इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला राज्यभर प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती श्रीरंग गोडबोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चिंटू,पप्पू, मिनी,बगळ्या,राजू आणि नेहा यांच्या समवेत एका साहसी खेळाच्या शिबीराला जातो आणि उलगडत जाते एक गोष्ट आणि उद्भूत साहसाची चित्तरकथा. अनेक अडथळे पार करत वर्षानुवर्षे कुणीही शोधू न शकलेला गुप्त खजिना कसा शोधतात याची रोमांचकारी गोष्ट म्हणजे चिंटू २ खजिन्याची चित्तरकथा आंतरराष्ट्रीय किर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे उत्कष्ट सेट्स अनुज देशपांडे यांचे स्पेशल इफेक्टस, अमलेन्दू चौधरी यांचे छायालेखन,गीतकार संदीप खरे आणि संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी या जोडगोळीचे अप्रतिम गीत-संगीत आणि श्रीरंग गोडबोले यांचे दिग्दर्शन या चित्रपटाच्या काही महत्वाच्या जमेच्या बाजू आहेत.

इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या चिंटू २खजिन्याची चित्तरकथा या चित्रपटाची पटकथा श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे यांनी लिहली आहे. पुण्याच्या शुभंकर अत्रे या बालकलाकाराने चिंटूची मध्यवर्ती भूमिका साकारली असून,सुबोध भावे,विभावरी देशपांडे, सतीश आळेकर, नागेश भोसले यांनी भूमिका साकारल्या आहेत.यावेळी बाल कलाकार शुभंकर अत्रे,विभावरी देशपांडे, पंडित चवेस आदी उपस्थितीत होते.