शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2015 (17:29 IST)

एंटरटेनमेंट पॅकेज असलेला वृंदावन सिनेमा लवकरच ….

कॅमेरा, साउंड, एक्शन असं म्हणत वृंदावन सिनेमाचा क्लायमेक्स शूट करण्यात आला. एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला, ड्रामा, अक्शन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पनवेलजवळच्या  आयुष रिसोर्टमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. आयुष रिसोर्ट म्हणजे सगळ्यात महागड लोकेशन. आतापर्यंत या लोकेशनवर फक्त बॉलीवूडच्या सिनेमांच शूटिंग झालंय. वृंदावन हा पहिला मराठी सिनेमा आहे कि ज्याचं शूटिंग अशा एक्स्पेन्सीव ठिकाणी करण्यात आलय.  हा सिनेमा प्रेक्षकांसाठी कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असणार आहे. हिंदी तसेच साउथमध्ये आपल्या अभिनयची जादू दाखवणारे राज प्रेमी या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमातल्या दोन गाण्यांचं शूटिंग पुढच्या महिन्यात पूर्ण होणार आहे, सिनेमाच प्रमोशनल सॉंग हे बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध चेहऱ्यावर चित्रित केल जाणार असल्याचीही बातमी आहे. मराठी सिनेमांमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेला असा अक्शन सिक्वेन्स या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारा राकेश बापट वृंदावनमधून  आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे. राकेशसोबतच पूजा सावंत तसचं वैदेही परसूरामी ही मुख्य भूमिकेत असणार आहेत. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे महेश मांजरेकर, अशोक सराफ, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर , भारत गणेशपुरे, या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला असा हा सिनेमा असणार आहे. आतापर्यंत रिजनल भाषेत काम करणारे टीलव्ही प्रसाद यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाच सूत्र हाती घेतलय. "मी बंगाली, साउथ अशा इंडस्ट्रीमध्ये काम केला असून मराठी भाषेत काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. या सिनेमाला सर्वोत्तम बनवण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. हा माझा पहिलाच सिनेमा असला तरी या  सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याचं टीएलव्ही प्रसाद यांनी सांगितलं. याबाबत निर्माते राज प्रेमी म्हणाले "मी स्वतः अभिनेता असून पहिला सिनेमा हा बनवायचा तो मराठीतूनच असा माझा हट्ट  होता, मी महाराष्ट्रात वाढलो राहिलो त्यामुळे मराठी सिनेमा करायचा मी ठरवलं,  
 
'रिअलस्टिक फिल्म कंपनी' या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार असून राज प्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पुर हे सिनेमाचे निर्माते आहेत.  हिंदी सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारे  गणेश आचार्य हे सिनेमाचे कोरिओग्राफर असून अमितराज यांनी सुमधुर अस संगीत दिल आहे. एकदंरच अगदी एंटरटेनमेंटचा मालमसाला असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.