गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2015 (10:06 IST)

नव्या धाटणीची लव्ह स्टोरी ढिनच्यॅक एंटरप्राइजमधून

प्रेमा तुझा रंग कसा? याचं उत्तर कोणाला ठाऊक असेल माहित नाही पण त्याची प्रचीती स्वतःहून घेण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. त्यामुळे आयुष्यात एकदातरी प्रेम करून पहायला हरकत नाही असो,  आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवट पर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीचे असे एक नाते आहे जे वैश्विक मानले जाते. मात्र त्याचे परीस्थितीनुरूप पालटणारे  स्वरूप नेमके कसे आहे यावर भाष्य करणारा ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३१ जुलै रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. अंधेरीतील दी क्लब या हॉटेलमध्ये नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंच करण्यात आले. सिनेमात मीरा आणि विशाल यांच्या जोडीप्रमाणे सिनेमाची कथा देखील तितकिच संवेदनशील आणि सत्य परिस्थितीचा आढावा घेणारी आहे. सर्व साधारण स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा प्रोडक्ट विकण्यासाठी वापरलं जाणारं मार्केटिंग समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठी देखील वापरता येऊ शकतं यावर एकूणचं सिनेमाची कथा बेतली आहे. निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली असून देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. समीर साप्तीक आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे.  

सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत तर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा सिनेमातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. ढिनच्यॅक या टायटल सॉंगने या म्युझिक लाँच सोहळ्याची रंगत वाढवली. 'हे नाते', 'रे मना' या रोमांटीक गाण्याने सोहळ्याची संध्याकाळ अधिक खुलली. सुप्रसिद्ध गायक मिकासिंग यांच्या आवाजाची नशा सगळ्यांनीच मनसोक्त अनुभवली.