शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

'पुणे व्हाया बिहार'प्रेमाचे सीमोल्लंघन'

WD
शेमारू एन्टरटेन्मेंट'च्या आगामी 'पुणे व्हाया बिहार' चित्रपटातून रसिकांच्या भेटीस वेगळी कथा येतेय. प्रेम, दोस्ती-दुश्मनी, राजकीय हेवेदावे यांच्या पार्श्‍वभूमीवर फुलणारी अभिजीत भोसले आणि तारा यादव यांच्या प्रेमाची भन्नाट कथा 'पुणे व्हाया बिहार' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पुण्यातला मुलगा व बिहारची मुलगी यांच्यात जुळून आलेली 'लवस्टोरी' यात पाहायला मिळेल. निर्माते अतुल मारू आणि केतन मारू यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केलंय. तगडी स्टारकास्ट, प्रेक्षणीय लोकेशन्स, सुमधुर संगीत आणि आधुनिक तंत्राची तेवढीच चांगली साथ असलेला हा मराठी चित्रपट म्हणजे फुल ऑन मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.

PR


प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा चित्रपट ३१ जानेवारीला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे लेखन सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी केले असून गीते सचिन गोस्वामी यांनी लिहिली आहेत. संगीतकार अमिर हडकर यांनी ही गीते संगीतबद्ध केली आहेत. नियम, अटी, चौकटींना न जुमानता राज्याच्या सीमा ओलांडून प्रेमाचे खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन करणारी उत्कट प्रेमकहाणी 'शेमारू एन्टरटेन्मेंट'च्या 'पुणे व्हाया बिहार' चित्रपटाच्या निमित्ताने ३१ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.