गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated : सोमवार, 25 मे 2015 (16:36 IST)

मराठीतील 5 आगामी नाट्यचित्र

येथे आम्ही तुम्हाला 5 मराठी येणार्‍या चित्रपटांबद्दल माहिती देत आहोत. 
 
टाइम बरा वाईट
भरपूर स्टंट, प्रेमकहाणी आणि विनोदाचा तडका असा सगळा मसाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. पाच वाजताची वेळ नेमकं कोणतं रहस्य उलगडणार? ही वेळ कोणासाठी चांगली व कोणासाठी वाईट असणार? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

राहुल भातणकर दिग्दर्शित या चित्रपटात भूषण प्रधान, निधी ओझा आणि सतीश राजवाडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 19 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
धुरंधर भाटवडेकर 
दोन परस्पर विरोधी स्वभावांच्या व्यक्ती एकत्र राहायला लागल्या तर त्यांच्यात ज्याप्रकारचे संबंध तयार होतील, त्याची गंमत या सिनेमात अगदी मजेशिरपणे दाखवण्यात आली आहे. परिस्थितीने दोन भिन्न प्रवृत्ती एकत्र आणल्या तर त्यांच्यात खटके उडणारचं. अविनाश धुरंधर आणि विश्वंभर भाटवडेकर हे दोघे एकत्र येतात आणि नंतर विनोदाचे स्फोट होतात. येत्या 29 मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
तुझ्या विन मरजावा
'तुझ्या विन मरजावा’ या चित्रपटात अनिकेत आणि निशाच्या तरल प्रेमाची गोष्ट विणली आहे. अनिकेत आणि निशा दोघेही पुण्यातील एकाच कॉलेजमध्ये शिकतात. दोघांमध्ये अतुट प्रेमाचे धागे विणले जातात.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मुलरी नल्लाप्पा आणि अशोक केळकर असून चित्रपटातील मुख्य अभिनेत्री प्रार्थना बेहरे व मुख्य अभिनेता विकास पाटील आहे. 
 
मर्डर मेस्त्री
'मर्डर मेस्त्री' हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे जो तुम्हाला रडवतो आणि हसवतो देखील. या चित्रपटात एखादया छोट्याशा सवयीनेसुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, क्रांती रेडकर, मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  
संदूक
‘संदूक’ या मराठी चित्रपटातून गेली अनेक वर्षं हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात रमलेल्या सुमीत राघवनचं मराठीत पदार्पण होणार आहे. १९४०च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ हा ऐतिहासिक–विनोदी चित्रपट आहे.

सुमीत राघवन आणि भार्गवी चिरमुले या प्रमुख जोडीबरोबर शरद पोंक्षे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. येत्या 5 जून   रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.