शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

माझी शाळा : कथानक

PR
शिक्षणपद्धतीवर भाष्य करताना आजवर कधीही प्रकाशझोतात न आलेला मुद्दा उपस्थित करणारा माझी शाळा हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. पॅशनवर्ल्डच्या बॅनरखाली तयार झालेल्या माझी शाळाचे दिग्दर्शन शांतनु अनंत तांबे यांनी केले आहे. सरकार सर्व शिक्षण अभियान उत्स्फूर्तपणे राबवत असले तरी प्रत्यक्षात मात्र किती मुलांना याचा फायदा होतो हा प्रश्न वादातित आहे.

आजच्या काळातही गरीब मुलांना शिक्षण सोडाच, पण त्यांच्या मूलभूत गरजा तरी पूर्ण होत आहेत का? शेतकर्‍याचा मुलगा शेतकरीच व्हायला पाहिजे. तो शिकून काय करणार? ही धारणा आजही समाजाच्या एका कोन्यात जपली जात आहे. सिनेमाची कथाही एका शेतकर्‍याच्या मुलाभोवती फिरते. अभिनेते अरूण नलावडे मध्यवर्ती भूमिकेत असून अलका कुबल-आठल्ये त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दीपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बालकलाकार आकाश वाघमोडे आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत.