गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: बुधवार, 5 नोव्हेंबर 2014 (16:18 IST)

‘क्लासमेट’मध्ये दिसणार तरुणाईचा जल्लोष

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आगामी ‘क्लासमेट’ या मराठी सिनेमाचा टीझर अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात प्रेम, मैत्री, जल्लोष, थरार संगीत असा संगम पाहायला मिळणार आहे. 2006 मध्ये आलेल्या ‘क्लासमेट’ या मल्याळम सिनेमाचा हा मराठी रिमेक आहे. तरुणाईचा सिनेमा असला तरी तो वेगळ्या धाटणीचा असणार आहे. 
 
या सिनेमाचे गीतकार गुरू ठाकूर असून अमित राज याचे संगीतकार आहेत. 1994 चा कालावधी या सिनेमातून दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमाचे संगीत, वेशभूषा या सगळ्याबाबतीत एक वेगळेपण सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सुयश टिळक, सचित पाटील, सुशांत शेलार, अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. व्हीडीओ पॅलेसचे नानूभाई आणि सुरेश पै यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.