testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाही स्नानाच्या संघर्षाचा इतिहास

पहिला शाही स्नान 12 फेब्रुवारीला

शाही स्नान
वेबदुनिया|
WD
WD
येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भारतभरातील लाखो साधु-संतांचे आगमन झाले आहे. कुंभमेळ्यातील पहिला स्नान 14 जानेवारीला मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर संपन्न झाला आहे. या महाकुंभमेळ्यातील विशेष आकर्षण मानले जाते. 12 जानेवारीला महाशिवरात्रीला पहिला शाही स्नान, 15 मार्चला सोमवती अमावास्येला दुसरा तर तिसरा शाही स्नान 14 एप्रिलला मेष संक्रांतीच्या शुभपर्वावर आहे. शाही स्नानासंदर्भात मागील पाने उलटविली असता अखाडे, साधु, विविध संप्रदाय यांच्यात खुनी दिसून येतो.

हरिद्वार येथे भरलेल्या महाकुंभमेळ्या चार महिन्यांच्या दरम्यान पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी सुमारे साडे सहा कोटी भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तराखंड सरकारने भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था ठेवली आहे.

गंगाचे महात्म्य-
कुंभमेळा
WD
WD
भगवान शिवशंकरजींच्या जटामधून उगम पावलेली गंगा नदी हरिद्वारला पृथ्वीला स्पर्श केला आहे. गंगा नदीला भारतीय संस्कृती, हिंदू धर्मात मोलाचे स्थान आहे. गंगा नदीच्या खोर्‍यात भारतीय संस्कृतीचा विकास झाला आहे. त्यामुळे हिंदू सनातन धर्मात पवित्र गंगा नदी पुजनीय आहे. शंकराचार्य यांच्यापासून रामानुज बल्लभाचार्य, रामानंद, कबीर व तुलसी आदींनी गंगेच्या साधनेला भक्तिचा अभिभाज्य अंग मानले आहे.
शाही स्नानातील संघर्षात्मक इतिहास:
शाही स्नानात लाखोंच्या संख्येने अखाडे व साधु यांच्यात झालेला साधा वादही खूनी संघर्षात रूपांतरीत होऊन जात असते. याला साक्ष आहे. हरिद्वार येथे कुंभमेळ्यात 1310 मध्ये महाकुंभमेळ्यात महानिर्वाणी अखाडे व रामानंद वैष्णव यांच्यात झालेली बाचाबाचे खूनी संघर्षात परिवर्तन झाले होते. 1398 यावर्षी तर अर्धकुंभमेळ्यात तैमूर लंगच्या आक्रमणात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.
1760 मध्येही शैव संन्यायी व वैष्णव बैरागी या दोन सुमदयात संघर्ष झाला होता. 1796मध्ये शैव संन्यासी व निर्मल संप्रदाय यांच्यात जुंपली होती. 1927 मध्ये कुंपन तुटल्याने मोठी दुर्घटना झाली होती. 2004 च्या अर्धकुंभात पोलीस कर्मचारीने एका महिलेची छेड काढ्ल्याने जनता रस्त्यावर उतरली होती. त्यात एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला होता.


यावर अधिक वाचा :

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

मधुचंद्राच्या रात्रीसाठी सत्यवतीने ऋषींसमोर ठेवल्या होत्या ...

national news
जेव्हा पराशर ऋषींनी सत्यवतीसोबत संबंध बनवण्याची इच्छा झाली तेव्हा तिने 3 अटी ठेवल्या... ...

आपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल?

national news
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु ...

अधिक मास: काय दान करावे?

national news
अधिक मासात अर्थात पूर्ण महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्ष येत असून कोणत्या तिथीला काय दान करावे ...

स्नानाचे महत्त्व

national news
स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ ...

राशिभविष्य